मला ग़ालिब किंवा साहिर च्या इतक्याच भिडणाऱ्या/री वाटतात तर काय म्हणाल?
वाटू शकतातच. त्यात गैर काहीच नाही.
मला वाटते की एका बाबतीत नीचभ्रू म्हणवणारे दुसऱ्या बाबतीत स्वत:च उच्चभ्रू बनू शकतात, तेव्हा दुसऱ्यावर टीका कशाला करायची?
कुणीच कुठल्याच 'आवडीने' उच्चभ्रू बनत नाही. दुसऱ्याला नीचभ्रू म्हटल्याने तर मुळीच नाही. एखादी टीका स्वतःवर उलटू शकेल या भीतीने ती न करणे अयोग्य आहे असे वाटते.
मग माणसाचे जीवन आणि अळीचे जीवन यात काय फरक राहिला?
मानले. पण याचा अर्थ क्षेत्रविशिष्टात रस नसणारी माणसे अळ्या आहेत असा होऊ नये इतकेच.
जिवाला भिडणाऱ्या/झोंबणाऱ्या/सुखावणाऱ्या अनुभूती आणि गदळ निवडणे, निव्वळ चर्चा करणे इ. गोष्टी या दोन्हींना केवळ करमणुकीची साधने म्हणून एकाच पातळीवर आणलेले अयोग्य वाटले.
शेवटी सारीच करमणूक आहे. नाही का?