आपण म्हटल्याप्रमाणे मी 'गालिबवाला' आहे म्हणून उत्तर देतो आहे.

जावेद अख़्तर ची काही चित्रपटगीते (उदा. हल्लीचे "मितवा...")
मला ग़ालिब किंवा साहिर च्या इतक्याच भिडणाऱ्या/री वाटतात तर काय म्हणाल? 
जर आपण गालिब वाचला नसेल तर काहीच वाटणार नाही. कुणाला काय भिडणारे वाटावे याचे नियम नाहीत.

जर आपण गालिब वाचला असेल, त्यातून आपल्याला अनुभूती आली असेल, तर आश्चर्य वाटेल. गालिबसारख्या प्रतिभावंत कवीला आपण केवळ वादविवादात एक मुद्दा म्हणून वापरले याचा खेद होईल. आणि पुढच्या वेळेस आपण गालिबविषयी मत व्यक्त केले तर आपल्या हेतूविषयी शंका येईल.

हॅम्लेट