नक्की कशावर वाद चाललाय इथे?
वेलणकर जे काही करतायत त्यात त्यांनी इस्टेट उधळून दिली तरच मग त्यांची प्रशंसा करायची का? आपल्या सगळ्यांना फुकटात तोंडची(की हातची) वाफ दवडता येते त्यांच्या प्रयत्नाने. त्यात त्यांचे कैक तास आणि ज्ञान हे दोन्ही खर्ची पडले आहे. आणि बरोबरच काही प्रमाणात का होईना पैसा ही. मग त्याबद्दल कृतज्ञ राहू नये का?
मायबोली काय किंवा मनोगत काय दोन्ही स्थळे त्या त्या लोकांनी (ऍडमिन वा प्रशासक) विकत घेतलेली आहेत. त्या ठिकाणाचे धोरण काय असावे हा केवळ त्यांचा निर्णय आहे. आपल्याला व्यासपीठ उपलब्ध झालेय म्हणजे आपण त्यांना सल्ले देऊ शकतो किंवा टिका करू शकतोच असे नाही. त्यांना जर काही गोष्टी प्रसिद्ध करण्याची इच्छा नसेल तर त्या गोष्टीचा आदर ठेवायला हवा. जोवर आपल्याला इथे सभासद होण्यासाठी पैसे पडत नाहीत तोवर या गोष्टींच्यासंदर्भात अधिकारवाणीने आपण बोलू शकत नाही.
कडवट वाटेल पण सत्य आहे.