वरील वादांमधे मूळ चर्चाच हुतात्मा होयला लागली आहे. सर्कीट महाशय आणि सर्वसाक्षी महाशय, तुम्ही दोघेही मन लावून मूळ काम करताय - ते ही वेळ शोधून. कृपा करून वैयक्तिक वाद सोडून द्या.
मी पण या (चर्चेसंबंधातील) वादात भाग घेतला आणि म्हणून कालपरवा मी पण गांधीजींची काही पत्रे वाचली त्यावरून त्यांनी फार काही मनापासून भगतसिंगाबद्दल काही प्रयत्न केले असे वाटले नाही. ते वाचताना - "जस्ट इन केस.. पॉलीटीकली करेक्ट राहण्यासाठी" केले असे वाटते. त्यात तळमळ अथवा ब्रिटीशांवरचा राग वगैरे काही दिसले नाही. काही वेळेस विचार आचार हे स्थलकालसापेक्ष असतात तर कधी व्यक्ती सापेक्ष. या चर्चेच्या बाबतीत गांधीजींचे विचार आचार हे "गांधी सापेक्ष" होते. ते ठीक आहे, पण त्याचे (घटनांचे) उदात्तिकरण नको की चुकीचे अनुकरण नको.
सुरवातीपासून वाद माझ्या दृष्टीने एव्हढच आहे की गांधीजींनी स्वतःचे विचार-आचार लपवलेले नाहीत. ते होते तसे होते. कुणाला आवडतिल तर कुणाला नाही. असेच इतर व्यक्तिंबद्दल - इथे भगतसिंगाबद्दल. उगाच कोणी कुणाच्याच कृतीचे समर्थन करू नये एव्हढेच वाटते. मग ते कधीतरी गांधी असतील तर कधी सावरकर, तर कधी नवभारतातील आवडणारी माणसे.