रदबदलीस स्पष्ट नकार दिला असता तर बरे झाले असते

गांधीजींच्या पत्रातून  असे दिसते की तेजबहादुर सप्रू आधी आयर्विनना भेटले; त्यांच्याशी चर्चा करून मग गांधीजींना भेटले. तेव्हा आयर्विन उद्याच्या फाशीविषयी अस्वस्थ आहेत हे गांधीजींना कळले. मग कदाचित सप्रूंनी किंवा आणखी कोणी पटवून दिल्याने गांधीजींनी शब्द टाकला असावा.

राजकीय दृष्टीने पहाता भगतसिंग प्रभृतींच्या फाशीने गांधीजींचा तोटाच झाला असावा. हौतात्म्य पत्करले की संबंधित व्यक्तीची जनमानसातील प्रतिमा जवळपास दैवी होते! (उदा येशू ख्रिस्त!) हुतात्म्यांचे गुणगान करणारे, त्यांना मानणारे आणि त्यांच्यासारखी 'ग्लोरी' (मराठी?) प्राप्त करण्यासाठी त्यांचे अनुकरण करणारे वाढतात. हे सगळे समजण्याइतके मुत्सद्दी गांधीजी नक्कीच असावेत. त्यादृष्टीने त्यांनी जर खरेच ही फाशी थांबवली असती तर एकतर त्यांची स्वतःची प्रतिमा उंचावली असती; शिवाय हुतात्म्यांचा चाहतावर्ग तयार झाला नसता. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी या हुतात्म्यांच्या मृत्यूचे भांडवल केले नाही. लोकांना चेतवण्यासाठी त्याचा वापर केला नाही यातून त्यांचा या मार्गाला असणारा विरोध दिसून येतो असे मला वाटते.

कॉग्रेसवाल्यांना चेतावणी देतो

(धोक्याचा) इशारा असे म्हणायचे असावे.