मिलिंदराव,
एका लेखात आपणच म्हटले होते की :
-----------------------------------------------------------------
प्रे. (बुध, १३/०९/२००६ - ०४:१९)
आणि दुसरे म्हणजे
जिथे तिथे क्रांतिकारकांचे गोडवे गाताना, एका महात्म्याची निंदा करायलाच पाहिजे का ? तरी हा लेख बरा म्हणायचा, कारण प्रत्यक्ष निंदा नाही, टोमणे असले तरी.
तात्यांचा पहिला प्रतिसाद वाचा, म्हणजे त्या पहिल्या दोन ओळींतून सर्वसाक्षींना जे ध्वनित करायचे होते, ते त्यांच्या चाहत्यांना ह्या कूटित रूपातूनही पोहोचले हे समजेल.
- मिलिन्द
-----------------------------------------------------------------
या ऐवजी भगतसिंगाचे, अन राजगुरूचे तत्त्वज्ञान मुन्नाभाईंनी पोहोचवले असते, तर सरकारी अधिकाऱ्यांचे किती खून (निरपराध नागरिकांना दूर ठेवून) घडले असते?
महात्म्याच्या तत्त्वज्ञानाची वाह वाह करताना, हुतात्म्यांच्या तत्त्वज्ञानाची खिल्ली उडवण्याची संधी आपण सोडत नाहीच...
दुसरे असे की, हु. भगतसिंहनी कधी आपल्याच लोकांना मारा असे सांगितले नव्हते. त्यांनी शत्रुला (इअंग्रजांना) संपवण्यासाठी तो मार्ग स्विकारला होता...
असो, आपणच म्हणता तसे, "एकदा कोणाचे भक्त झाले की....."
--सचिन