...हे गांधींच्या प्रतिकार तंत्राचे रहस्य होते. पाकिस्तानच्या निमिर्तीच्या वेळी बंगालमध्ये अत्याचार सुरू झालेत, तेव्हा ते तेथे धावून गेलेत, तेथील हिंदूंना धीर देऊन त्यांची पुरुषार्थ वृत्ती जागृत केली व मुसलमान गुंडांच्या हृदयातील माणुसकी व बंधुत्वाची भावना जागृत केली. अशी ही दुहेरी साधना होती. एकाची मर्दुमकी जागृत करायची आणि दुसऱ्याची माणुसकी. याची प्रचिती अल्प प्रमाणात का होईना, तेथे आली...

वरील परीच्छेद हा न्या. धर्माधिकारींच्या मटा मधील लेखातील आहे. गांधीजींनी हिंदूंची पुरूषार्थ वृत्ती नोआखलीत जागृत केली म्हणहे नक्की काय केले? आणि
तोच प्रश्न मुसलमानांच्या संदर्भात - माणुसकी जागृत केली म्हणजे काय केले?

कृपया दाखला असल्यास अभ्यासू उत्तर द्या, भावनात्मक नको.