मला वाटतं कि, यात खालील मुद्दे आहेत:

१) हे अहवाल दुषित दृष्टीकोनातून लिहीले जातात.

२) त्याचा परिणाम मात्र दूरगामी होतो.

३) आपल्याला आपला देशाचे बरे व्हावे असं वाटत असल्याने आपणही या अश्या लेखांची दुसरी बाजू (जसे कि, बाकीच्या देशातल्या स्थानिक लोकांच्या नोकऱ्यांवरती गदा आल्यामुळे हा अहवाल आपल्या विरूद्ध वापरला जातो इ.इ.) बाहेर आणली पाहीजे.

४) या जगामध्ये फक्त मनगटाच्या बळावर, पैशाच्या जोरावर आणि कुटील नितीचाच वापर करत सर्व व्यवहार होतात. आपण आतापर्यंत त्यात कुठेच नव्हतो, पण आता आपल्याला पण खेळायची संधी मिळाल्यामुळे त्यांचे सर्व नियम समजून घेऊनच त्याप्रमाणे आपण वागायला हवे.

५) याचे ठळक उदाहरण म्हणजे जागतिक पातळीवर आतापर्यंत पुढे असलेला

जपान , आता भ्रष्टाचाराच्या बाबतीतही फार पुढे आहे अशी माहीती बाहेर आली आहे आणि जपानने पण ती मान्य केली आहे. आता ती जागा ( व्यापारातील) भारतासारखे देश घेऊ पहातायत. पण व्यापारी बदलले पण मूळ ग्राहक (मुख्यत: अमेरिकादी देश) तेच आहेत आणि त्यांच्या मागण्या बदललेल्या नाहीत. ते जे नियम आहेत तेच आपण पाळतोय इतकच!!

६) पण  आता आपल्याला जास्त जागरूक राहून अश्या प्रकारच्या बातम्या आपल्या विरूद्ध जर येत असतील तर त्यांना एकत्रित तोंड देणे. याबाबतीत मी दिलेली माहिती / अहवाल  बघा. त्या माहितीचा पुढचा भाग म्हणजे, NASSCOM  चे श्री. कर्णिक  यांनी या संदर्भात ठोस पुरावे मागितले आहेत आणि तसे मिळाले नाहीत तर त्यांनी या प्रकाशित अहवालावरती (आणि पर्यायाने त्या संस्थेवरती )विश्वास ठेवता येणारच नाही असे स्पष्ट केले आहे.

७) सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंतर्गत सुधारणा. या आणि अश्या अहवालावरून माहिती घेऊन  आणि ती खरी समजून अपराध्यांना अतिशय कडक शिक्षा आणि ती ही लवकरात लवकर !!

मला वाटतं , या प्रमाणे  प्रयत्न  केले पाहीजेत.

प्रसाद.