गाडीवर माझ्या मागे माझा इंदूरचा मामेभाऊ बसला होता. गाडी सिग्नलला उभी होती. मी मोबाईलवर बोलत होतो. तेवढ्यात तो म्हणाला, "अरे चल, हिरवा दिवा जळून गेला!" क्षणभर मी भ्यालोच! म्हटलं कुठे आग-बिग लागली की काय? नंतर उलगडा झाला... त्याला म्हणायचं होतं की हिरवा दिवा लागला आहे, पण फरक एवाढाच की त्याने हिंदीतल्या 'हरी बत्ती जल गयी'चं शब्दशः भाषांतर केलं! :)