सातचा अर्थ किंवा संदर्भ काय असा सरळ प्रश्न नाही ना विचारलात पण. ज्या मुलीची आणि आपली ओळख नाही, जिच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही तिला चारचौघांच्यात, एका जाहीर मंचावर 'सात वर्षे याचा संबंध लग्नानंतरच्या सेव्हन इयर्स इच शी आहे का ' असं विचारणं हे सभ्यतेला धरून आहे का? मला तरी ते तसं वाटलं नाही. मला हा माझ्या खासगी गोष्टीत नाक खुपसण्याचा प्रकार वाटला. शिवाय सात वर्षे हे ऐकल्यावर इतर सगळे संदर्भ सोडून नेमका हाच संदर्भ का आठवावा हेही मला कळले नाही. अशा प्रकारचे फाजील प्रश्न विचारणाऱ्यांना जे उत्तर योग्य आहे तेच मी आपल्याला दिले आहे. आपल्याला राग आला असेल तर त्या गोष्टीच्या परिणामांचा विचार लिहिण्याआधी करायला हवा होता.
आपले वाक्य असे होते
"'सात वर्षे' संदर्भ लागत नाही. सातच का?
लग्नानंतर सात वर्षानी येणाऱ्या 'सेव्हन ईयर इच (Seven Year Itch) कडे तर हा इशारा नाही ना? स्पष्टीकरण आल्यास कवितेचा आशय अधिक स्पष्ट होईल."
मी माझ्या कवितेत एकाही पाश्चात्य प्रतीकाचा किंवा संकल्पनेचा वापर केलेला नाही. असे असूनदेखिल आपण मला हा प्रश्न विचारलात म्हणून माझ्या उत्तराला उपरोधाचा आणि रागाचा सूर आहे. आपण जुने आणि जाणते मनोगती दिसता. उगाचच वडाची शेंडी पिंपळाला लावल्यासारखे आपले हे बोलणे मला आवडलेले नाही. 'सात' यावरून जर सेव्हन इयर इच हा अर्थ सरळसरळ निघत असेल तर भारतीय आणि मराठी सामाजिक रचना आणि परंपरा यांना अनुसरून साडेसात हा संदर्भ अधिक सहजपणे लागायला हवा. हा मला अभिप्रेत असलेल्या अर्थांपैकी एक अर्थ आहे हे मी मागेच स्पष्ट केले आहे. आणि सात वर्षे यावरून साडेसाती हे कोणी ओळखावे हे मला अपेक्षितच नव्हते हे मी सर्किटरावांनाही सांगू इच्छिते.
जयंतराव, अर्थ आणि स्पष्टीकरण आपण मला विचारलेत. उद्धटासी उद्धट हा न्याय सर्किटरावांना लागू आणि मला मात्र नाही हा कुठला न्याय?
आपण मला प्रतिक्रिया कळवा अथवा कळवू नका पण हा असा प्रकार यापुढे कोणत्याही मुलीच्या बाबतीत होणार नाही याची मात्र दक्षता घ्या.
संपदा