तुमचा आक्षेप मान्य आहे. पण मुळातच मध्यमवर्गीय असल्यामुळे कधी बाहेर जाऊन कॉफी पिण्याचा योग आलाच नव्हता. आम्ही कॉफी 'बाहेर' पिणार म्हणजे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये. आम्ही एस्प्रेसो कॉफी काय असते ते फक्त दूरदर्शन वरच बघीतलंय. अत्यंत फेसाळलेली कॉफी म्हणजे 'एस्प्रेसो कॉफी' हीच काय ती आमची कल्पना. तुमच्यासारखा कधी खोलात जाऊन एस्प्रेसो कॉफीचा अभ्यास केलाच नाही. माझ्या बऱ्याच मित्रांना ही कॉफी आवडली, म्हटलं, मनोगतींना ही पद्धत सांगावी, असो.
माहितीबद्दल धन्यवाद आणि फसवणूकीबद्दल (नकळत केलेल्या) क्षमस्व.
अहो फसवणूक कसली? मला तरी अगोदर कुठे ठाऊक होतं? भारतात असताना अत्यंत फेसाळलेली कॉफी म्हणजे एस्प्रेसो कॉफी अशी माझीही समजूत होती.
आणि मिनेस्ट्रोनी सूपमध्ये नूडल्ससुद्धा घालतात / मेक्सिकन फूडमध्ये पनीरसुद्धा वापरतात हेही भारतभेटीतच कळलं.
फार काय, ती तरला दलाल जे काही भयंकरभयंकर दाखवत असते, त्यातल्या काही प्रकारांना मेक्सिकनसुद्धा म्हणता येतं (म्हणजे निदान ती तरी म्हणते) हे देशी टीव्ही चॅनेल्स बघूनच कळलं. असो.
एक विनंती: तुम्ही जर या पद्धतीने केलेली प्यायली कॉफी नसेल तर जरूर करून पहा, तुम्हाला देखील ती आवडेल.
तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं बनवलेली कॉफी चांगली लागेल याबद्दल वाद नाही; कधीच नव्हता. फक्त याला एस्प्रेसो म्हणता येणार नाही एवढंच म्हणण्याचा हेतू होता.
- टग्या.