लेख वाचून मजा आली असे लिहिणार होते, पण त्याआधी आधीच्या प्रतिक्रिया वाचल्या. त्यात लेखकाने सरकारी कर्मचाऱ्यांवर व राजकारणी लोकांवर यथेच्छ तोंडसुख घेतले आहे. पण त्याशिवाय काही कृती केली का ( तात्यांचा प्रश्न) तर उत्तर नाही. त्याचे लांबलचक स्पष्टीकरण. जर तुमच्यामध्ये कृती करण्याचा आळस असेल तर 'त्याचा काय उपयोग; कोणीतरी डूख धरेल' वगैरे सबबी देण्याला काय अर्थ आहे? सामान्य माणूस नुसती बडबड करेल, बाकी काही नाही हे माहित असल्याने राजकारण्यांचे फावते.

थिल्लर, अडाणी, गुंड प्रवृत्तीचे लोकं राजकारणात घुसल्यावर कसे होणार देशाचे?

देशाचे अवघड आहे हे खरेच. पण मग तुम्ही का जात नाही राजकारणात? त्या मोहोळ माणसासारखा आपलाही खून होईल अशी भीती वाटते का? की एव्हढी धावपळ कोण करणार, आपल्याला काय जमणार असे वाटते?

परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही छोटेसे देखील पाऊल उचलले नसेल तर एव्हढे तारांगण घालण्याचा तुम्हाला काहीएक अधिकार नाही!