संपदाताई,
सर्वप्रथम कवितेबद्दलचे मत सांगतो. कविता छान आहे. अष्टाक्षरीतील लयबद्ध मांडणी भावली.
जयंतरावांनी विचारलेला सेवेन यर्स इच चा संदर्भ सभ्यतेला सोडून आहे, असे मला वाटत नाही; कारण सात वर्षे म्हटल्यावर त्यांना तोच संदर्भ का आठवला, याचे कारण त्यांनी त्यांच्या दुसऱ्या प्रतिसादात स्पष्ट केलेच आहे. अर्थात, त्यांना हा संदर्भ का अपेक्षित होता/वाटला, याचे कारण त्यांनी मूळ प्रतिसादात न देता आपली प्रतिक्रिया पाहून मग स्पष्ट केले, ही त्यांची चूक झाली असे मला वाटते आहे.
संपदाताई, सात वरून सेवेन यर्स इच हा संदर्भ न लागता साडेसात हा संदर्भ सरळसरळ लागावा, हे आपले विधान मात्र 'आस्किंग फ़ॉर टू मच' नि तार्किकदृष्ट्या चुकीचे आहे, असे माझे मत आहे. सात वरून सेवेन असाच सरळ संबंध लागतोय. साडेसातचा संदर्भ तितकासा स्पष्ट नाहीच. नवीन कवितांमध्ये पाश्चात्य संदर्भसुद्धा असू शकतात आणि कविता लिहिताना कवी ते संदर्भ स्पष्ट करण्यासाठी बांधिल असतोच, असे नाही. पण म्हणून भारतीय परंपरा, मराठी समाजरचना आणि संस्कृतीप्रमाणे वाचकांनी आपल्या त्या ओळीचा संदर्भ लावावा, अशी अपेक्षाही करणे योग्य नाही. विविध अंगांनी,विविध संदर्भांच्या बाबतीत जर तुमच्या कवितेचा विचार होत असेल, तर ते स्पृहणीय आहे आणि कवयित्री म्हणून तुमचे तसेच रसिक म्हणून वाचकांचे यश आहे, असे मला वाटते. आणि सात वरून साडेसात आठवावे, हे तुम्हालाही अपेक्षित नाही, असेच तुम्ही वरील प्रतिसादात म्हटले आहे. मग असे असताना कवितेबद्दलचे मत वैयक्तिक घेऊन हा आक्रस्ताळेपणा कशासाठी?
जयंतरावांना जर तुम्ही जुने-जाणते मनोगती संबोधता, तर त्यांच्या जुने-जाणतेपणावरून तरी सार्वजनिक सभ्यता सोडणारे/तिला धक्का लावणारे लेखन (साहित्य अथवा प्रतिसाद) त्यांनी आजवर केलेले नाही, हे तुम्हाला कळले नाही का, याचे आश्चर्य वाटते. ते तुम्हाला कळले नसेल, तर दुर्दैव आहे; पण कळून सवरूनही जर तुम्हाला तुम्ही केलेली शेरेबाजी अयोग्य वाटत नसेल, तर तुमच्या त्यांना दिलेल्या अनाठायी प्रतिसादातून तसेच वरील प्रतिसादातून प्रतीत होणारी मुजोरी खेदजनक आहे.