मृदुलाताई,
गांधीजींच्या पत्रातून असे दिसते की तेजबहादुर सप्रू आधी आयर्विनना भेटले; त्यांच्याशी चर्चा करून मग गांधीजींना भेटले. तेव्हा आयर्विन उद्याच्या फाशीविषयी अस्वस्थ आहेत हे गांधीजींना कळले. मग कदाचित सप्रूंनी किंवा आणखी कोणी पटवून दिल्याने गांधीजींनी शब्द टाकला असावा.
मातृभूमीवरील प्रेमापोटी भगतसिंगाने हत्यादी कृत्ये केली, असे गांधीजींना प्रामाणिकपणे वाटले असते; तसेच फाशी रद्द होण्याची तळमळ असती, तर प्रस्तुत पत्र लिहिण्यासाठी त्यांना ते कोणी पटवून देण्याची गरज असती का, असा प्रश्न मला येथे पडतो. गांधीजींनी स्वतःहून शब्द का टाकला नाही, याचे खेदजनक आश्चर्य वाटते.
त्यादृष्टीने त्यांनी जर खरेच ही फाशी थांबवली असती तर एकतर त्यांची स्वतःची प्रतिमा उंचावली असती; शिवाय हुतात्म्यांचा चाहतावर्ग तयार झाला नसता. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी या हुतात्म्यांच्या मृत्यूचे भांडवल केले नाही.
गांधीजींना असे काही करण्याचे गरजही नव्हती, असे वाटते. सविनय कायदेभंगादी चळवळी, अहिंसेचे तत्त्व आणि साधनशुचितेच्या बळावर गांधीजींनी कमावलेली लोकप्रियता वृद्धिंगत व्हायला त्यांना क्रांतिकारकांच्या मृत्यूचे भांडवल करायची गरज नाही. त्यांचे स्वतःचे तत्त्वज्ञान आणि प्रचंड जनाधार ही त्यांची लोकप्रियता जपणारी खरी साधने :) अर्थात, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असे भांडवल केले गेले नाही, हे बरेच झाले, ज्यायोगे गांधीजींच्या साधनशुचितेला तरी बाधा पोहोचत नाही :)
(धोक्याचा) इशारा असे म्हणायचे असावे.
याप्रमाणेच पत्रातील भाषेवरूनही असे तर्कवितर्क लढवणे, अंदाज बांधणे इतकेच आपण काय ते करू शकतो, आणि म्हणूनच अशा संदिग्धतेमुळे गांधीजींच्या हेतूविषयी शंका घेण्यास वाचकांना पूर्ण वाव उरतो :)