मी माझा मुद्दा मांडला आहे. हसवणूक यांनी त्याचा त्यांना हवा तसा अर्थ काढला आहे. माझे म्हणणे एवढेच आहे की सात वर्षे यावरून जितक्या सहजपणे सेव्हन एअयर इच(हे नक्की काय आहे देवच जाणे पण त्यातल्या इच शब्दामुळे मला जाम शंका आहे की काहीतरी वाईट असावे) आठवते तितक्याच सहजपणे साडेसात वर्षांचा संदर्भही आठवू शकतो. मी हे पुन्हा एकदा सांगते की जर अ असेल तर ब अशा अर्थाचे हे विधान आहे आणि जयंतरावांनी मला सात शब्दाचे स्पष्टीकरण विचारले आहे म्हणून साडेसात हा मुद्दा मधे आला आहे
त्यातून इथे ज्याला त्याला आपले मत मांडायला परवानगी आहे फक्त मला नाही असे दिसतेय. हसवणूक महोदयांनी मला मुजोर ठरवले आहे. सर्किटरावांनी उद्धट. आता या दोघांच्या मनोगती नावांच्या आधारे मी एक प्रतिसाद हसण्यावारी नेत आहे आणि दुसरा शॉर्ट सर्किट झाला असे समजत आहे.