गोष्ट गोंडस आहे. अजून एक (जरा नाठाळ) आठवली:
एक माणूस आपल्या पत्नीला घेऊन नदीकाठी फिरायला गेला होता. अचानक त्याच्या पत्नीचा पाय घसरला आणि ती नदीत पडली. नवऱ्याला काही ती दिसेना आणि तिला पोहताही येईना. त्याला खूप भीती वाटली आणि तो ढसढसा रडायला लागला. त्याचं ते रडणं ऐकून तिथे त्याला देव प्रसन्न झाला आणि त्या माणसाच्या रडण्याचं कारण समजल्यावर म्हणाला - "एवढंच ना, आत्ता मी तुझी पत्नी नदीतून सुखरूप बाहेर काढतो - मुळीच रडू नको".
असं म्हणून त्याने नदीतून श्रीदेवीला बाहेर काढले. तो माणूस बघतच बसला आणि म्हणाला - "ही नाही हो, माझी पत्नी काही श्रीदेवी नव्हे". मग देवाने नदीतून माधुरी दिक्षितला बाहेर काढले, त्या माणसाने पुन्हा स्वीकार करायचा नकार दिला. मग शेवटी देवाने त्याच्या खऱ्या पत्नीला बाहेर काढल्यावर तो रडायचं थांबला.
त्याचा खरेपणा बघून देव त्याच्यावर प्रसन्न झाला आणि म्हणाला - " वत्सा तुझ्या आदर्श वागण्यानी मी प्रसन्न झालो - ह्या तिन्ही बायका तुलाच ठेव! "