माझ्या संगणकावर सद्ध्या एक्स्पी आणि PCQlinux 2005 आहे. काही कारणाने मला दुसरे एक्सपीचे टाकायचे होते,
दुसरे एक्सपी टाकायचे होते म्हणजे सध्या असलेल्या ठिकाणी एक्सपी री-इंस्टॉल करायचे आहे की जुने तसेच ठेऊन दुसऱ्या पार्टिशन वर नव्याने इंस्टॉल करायचे आहे?
म्हणुन मी बुटेबल सीडी टाकली आणि संगणक परत चालू केला, परंतु नेहेमीचे डॉस न उघडता DR-DOS नावाचे काहीतरी चालू झाले, आणि त्यामधे ती सीडी चालू शकत नव्हती.
कोणती बुटेबल सीडी? सीडी ड्राइव्ह हेच "फर्स्ट बूटेबल डिव्हाइस" आहे ना?
ज्या ड्राईव्ह वर लिनक्स आहे ते फ़ॉर्मॅट करावे म्हणुन partition magic नावाचे सॉफ्टवेअर उतरवून घेतले आणि लोड केले. परंतु तिथेच काहीतरी प्रॉब्लेम झाला. ते जेव्हा मी रन करायला गेले तेव्हा एरर आली, संगणक परत चालु केला, तर तो आता GRUB मधे जातो!!
"ग्रब"च्या स्क्रीनवर काय पर्याय दिसतात?