एक्स पी बूटेबल सीडी किंवा अजून कुठल्याही पद्धतीने एक्स पी चा कमांड प्रॉम्प्ट मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर खाली दिलेल्या कमांड वापरा.

fixboot c:

या कमांडमुळे तुमचा जो बूट लोडर आत्ता ग्रब आहे तो बदलून आधीचा एक्स पी चा मिळेल. त्यानंतरही तुम्हांला पार्टिशन मॅजिक लोड करण्याची गरज नाही. एक्स पी मधेच  कंट्रोल पॅनेल>ऍडमिनिस्ट्रेटिव टूल्स>कॉम्प्युटर मॅनेजमेंट मध्ये जाऊन डिस्क मॅनेजमेंट वर क्लिक करा. तिकडे तुम्हाला एक अनरेकग्नाइज्ड पार्टिशन दिसेल. म्हणजे त्यावर FAT,NTFS असे काही दाखवणार नाही. तिकडून ते पार्टिशन FAT32 किंवा NTFS मधून फ़ॉर्मॅट करा. यामुळे तुमची अडचण दूर होईल.

जर सीडी वरून बूट होत नसेल, तर खरच कॉम्प्युटर सुरु केल्यावर सीडी रॉम चा लाईट लागतोय का(बायोस मधून पुढे गेल्यावर) ते तपासून पहा. नसेल तर बायोस मधे केलेले सेटिंग्स नीट सेव झालेले नसतील.

सूचना: fixboot ही कमांड वापरण्याआधी fixboot/h ही कमांड देऊन त्याची हेल्प बघावी.(काळजी म्हणून)