चेतावणी या शब्दाचा मराठीतला चुकीचा वापर अधोरेखित करायचा होता. हिंदीत चेतावनी म्हणजे धोक्याचा इशारा, वॉर्निंग. सर्वसाक्षींनी गडबडीत हिंदी शब्द वापरला असावा, म्हणून 'असावे' असे म्हटले.

गांधीजींचे पत्र स्पष्ट आहे असे मला (तरी) वाटते. सप्रू वगैरे गोष्ट, आपल्याला नाही तरी, आयर्विनना माहित असणार. शेवटी ते पत्र आहे. जाहीरनामा किंवा लेख नाही. त्यामुळे आयर्विन सोडून इतरांना सगळेच समजावे अशी अपेक्षा फोल आहे.