कुकूचकू!
कुक्कुटधर्माच्या दीक्षाभूमीवर सगळं चैतन्याचे वातावरन आहे! मी आपला रुपयाला दहा आळ्या इकणाऱ्या स्टॉलवर गेलो आणि सहज चिवडता चिवडता त्याला इचारलं,
"कुकूचकू! काय तुमचे छोटे यिवराज कोंबडे काय म्हंत्यात?"
तर त्यो म्हंतोय कसा?
"काय सांगू तुमास्नी राओ! परवा एका प्रस्थापित कोंबडीनं माझ्या पिलाला इचारलं "आमच्याबरूबर चल तिकडं चांगल्या आळ्या हाइत!" तर माझा छोकरा म्हंतोय कसा? "आम्ही काय ब्रॉयलर आहोत काय? " काय सांगू माझी छाती कसली फुगून आली म्हण्ता? पन क्रॉसवाल्या लांडग्याच्या डोल्यात येऊ नये म्हणून मी आपली लगेच लहान केली. पन तुमास्नी म्हनून सांगतो आमचम पोरगं लई गुनाचं आहे बारा xxxx आहे म्हणाना! फुडं मागं बालकुक्कुटब्रिगेड मधी जान्यासाठी एक्दम तैय्यार हाये!"
कुकूचकू!