fixboot या कमांड मुळे तुम्हांला तुमचा एक्स पी चा बूट लोडर परत मिळतो. जो लिनक्स केल्यामुळे ग्रब झालेला आहे. आणि डिस्क मॅनेजमेंट मध्ये जेवढी पार्टिशन्स तुम्ही लिनक्स साठी वापरली होती तेवढी सगळी अनरेकग्नाईज्ड म्हणून दाखवेल. आणि एक्स पी हे फ़क्त FAT नाहीतर NTFS एवढेच सपोर्ट करते, त्यामुळे उरलेली सगळी लिनक्सचीच असावीत.
याशिवाय तुमची जुनी एक्स पी ची पार्टिशन्स पण दिसत आआहेत का ते तपासून पहा. त्यामुळे उगीच चुकीची पार्टिशन्स फ़ॉर्मॅट होण्याचा धोका टळेल.
जर fixboot मुळे तुमचे एक्स पी व्यवस्थित सुरु झाले असेल तर अनरेकग्नाईज्ड (म्हणजे लिनक्सची) पार्टिशन्स FAT किंवा NTFS ने फ़ॉर्मॅट करायला काहीच हरकत नाही. कारण fixboot मुळे एक्स पी चा बूट लोडर मिळाल्यानंतर तुम्हांला लिनक्स मध्ये जाण्याचा मार्गच बंद होतो. त्यामुळे साहजिकच लिनक्सची पार्टिशन्स पुसून टाकण्यास काहीच हरकत नाही.
सूचना: पार्टिशन्स परस्पर फ़ॉर्मॅट करण्यापेक्षा आधी ती डिलिट करुन नंतर परत हव्या तेवढ्या साईजमध्ये बनविणे केव्हाही चांगले, कारण लिनक्समध्ये 'स्वॅप' म्हणून वापरलेले एक छोटे पार्टिशन असते जे FAT32 मध्ये फ़ॉर्मॅट करतांना अडचण येऊ शकते.
अजूनही काही अडचण अथवा शंका असल्यास सांगावी. मला जमेल तेवढी मदत मी नक्की करीन. हे सगळं मराठीत लिहिताना मला खूप आनंद होत असून मजा येत आहे. यासाठी मी 'मनोगत'चे आभार मानतो.