भाषांतराबद्दल धन्यवाद, सुहासिनी.

गांधीजींना मनापासूनच ही फाशी रद्द व्हावीशी वाटत नव्हते

असे त्यांना मानवतावादी दृष्टिकोन सोडल्यास इतर कोणत्या कारणाने वाटावे? फाशी रद्द करता येत नाही, लांबणीवर टाकता येईल हे आयर्विनांचे म्हणणे कायद्याला अनुसरून असावे. आपल्या भारतीय कायद्यातही संसदेवर हल्ला केल्याबद्दल अतिरेक्यांना फाशीची शिक्षा झाली आहे. इंग्रजांच्या दृष्टीने भारत हा त्यांचा प्रांत होता व येथील हल्ले हे त्यांच्या सरकारवरचे हल्ले. इंग्रज हे प्रेमळ, अगदी न्यायाने वागणारे राज्यकर्ते होते असे मला मुळीच म्हणायचे नाही. इथले राज्य टिकवण्यासाठी जे करणे आवश्यक होते ते सगळे त्यांनी केले. गांधीजींच्या दृष्टिकोनातून एखाद्या माणसाची हत्या वा हत्येचा देखावा (प्रयत्न) म्हणजे त्या माणसाची मनःस्थिती ठीक नसल्याचा पुरावाच. तेव्हा एकंदरित या बाबतीत काही खोटेपणा, ढोंग नसल्याचे माझे मत बनले आहे.