काल या विषयावर "द हिंदू" या दैनिकात अडवानी आणि भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंग यांची एक बातमी आली होती. दोघेही भाजपा नेते राष्ट्रपतींची आज गाठ घेऊन फाशीची शिक्षा रद्द करू नये अशी विनंती करणार होते.

त्यात राजनाथ सिंग यांच्या तोंडी अशा अर्थाचे उद्गार आहेत की ज्या भगतसिंगने संसदेत बाँब टाकला त्याच्या फाशीची शिक्षा गांधीजी आणि काँग्रेसने रद्द करण्यासाठी काही केले नाही. (गांधीजींची जी काही पत्रे मनोगतवर सध्या छापली गेली आहेत त्यात पण त्यांनी फाशीच्या शिक्षेला जरी मानवतेच्या कारणामुळे विरोध असल्याचे सांगीतले तरी भगतसिंग व साथिदारांची शिक्षा मात्र फक्त लांबणीवर टाकायची विनंती केली असेच वाटते).

मग आता अफझलची फाशी का रद्द करायची?

आत्ता पर्यंत आलेल्या बातम्यांप्रमाणे (कृपया काही वेगळी बातमी पाहीली असल्यास सांगा). अफझलच्या फाशी बद्दल सत्ताधारी काँग्रेसचे काय म्हणणे आहे? की "मौनं सर्वार्थ साधनम?"

शिवाय एकंदरच स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक (विचार पटो अथवा न पटोत) आणि सध्याच्या अतिरेक्यांची तुलना करणे योग्य आहे का?