विशारदा, रोहिणी, अनिकेत, वेदश्री, चाणक्य, हिंदू, प्राजु, मोरू, देवकी पंडित,

प्रतिसादाबद्दल मन: पूर्वक आभार! मागचा आठवडा थोडा गडबडीचा गेला, त्यामुळे लिहायला जमले नाही. क्षमस्व!

विशारदा, रोहिणी, जरूर लिहिण्याचा प्रयत्न करेन. हत्यारांची (एडिटर वगैरे) जमवाजमव करायला हवी. असे लिहायला खूप वेळ लागतो.

अनिकेत,
भावड्या??!!! हा हा हा :) प्रतिसाद आवडला!
कोल्हापुरातल्या आठवणींना एक वेगळी गोडी, चव आहे.
सहमत!

वेदश्री,
थोरली आई, तिथले भजनीमंडळ, आक्कामावशी यांच्यावर लिहायचा विचार आहे. आणि हो, मामालोक आणि मित्रमंडळी यांच्या कट्ट्यावरही लिहायचे आहे... वेळ काढायला हवा. :)

चाणक्य,
घरा घरात होणारी मिसळ अन मोठे बटाटे वडे...

अहाहा! माझ्या मोठ्या मामी मिसळ एवढी सुंदर बनवतात म्हणून सांगू! झणझणीत. तात्यांनी "आवडलेल्या मिसळी"बद्दल मनोगतावर प्रश्न विचारला होता, पण घरी बनवलेल्या मिसळीला एंट्री नव्हती! एव्हढे वाईट वाटले... खूपच अन्याय होतोय असे वाटले. :) आमच्या मामी मिसळीसाठी कांदा सुद्धा एवढा सुंदर चिरायच्या... त्यांना अजिबात धेडगुजरीपणा खपत नसे. सगळे व्यवस्थितच केले पाहिजे असा अट्टाहास असे. पण अंतिम उत्पादनावर या सगळ्या गोष्टींचा ठसा असेच. त्या मिसळीवर पण काही लिहावे असे वाटतेय. पाहू. :)

मला वाटत या खाऊगिरी मध्ये कोल्हापूरी प्रेमाची चव जास्त असावी.
सहमत. तसे पाहिले तर या गोष्टी इतरत्र मिळत नाहीत असे नाही. पण "सगळे जमून येणे" म्हणतात ते तिथेच होत असे. त्याचे कारण खाऊपेक्षा तिथले प्रेम हे असावे.

हिंदू,
माझा कोल्हापुराचा अनुभव फक्त सुट्टीतला. त्यामुळे आपण लिहिल्या आहेत त्या सगळ्याच गोष्टींचा आनंद काही मी घेतलेला नाही. :( पण वाचून छान वाटले!

प्राजु,
आपण, आणि हिंदू, फारच नशीबवान आहात असे वाटते. मी किनाऱ्यावर डुबक्या मारून एवढा आनंद मिळवला, पण तुम्ही तर "आनंदाचे डोही" सततच डुंबलेले होतात!

मोरू,
दर सुट्टीमध्ये तिकडे गेले की माझे वजन ४-५ किलोने नक्कीच वाढायचे. तिथल्या अन्नामध्ये जो जिव्हाळा आहे तो कुठेही भेटणार नाही.
अगदी खरे.

आपणा सर्वांच्या प्रतिसादांमुळे आणखी लिहायला प्रोत्साहन मिळाले. धन्यवाद

-प्रभावित