असे त्यांना मानवतावादी दृष्टिकोन सोडल्यास इतर कोणत्या कारणाने वाटावे?
गांधीजींच्या आदर्शवादापासून किंवा तत्त्वज्ञानापासून काँग्रेसमधली तरुण मंडळी फारकत घेतील, जनतेमध्ये क्रांतिकारी विचार आणि कार्यपद्धती जोमाने वाढीस लागून गांधीवादाचा (गांधीजींचा?) काँग्रेसमधील आणि/किंवा जनतेवरील प्रभाव कमी होईल, काँग्रेसला राजकीय तोटा होईल, ही आणि/किंवा अशी अनेक शक्य कारणे असू शकतात, असे मला वाटते. वैयक्तिक शत्रुत्त्व (खुन्नस या अर्थी) नसेलही कदाचित, मात्र राजकीय हेतूपूर्ततेसाठी म्हणा किंवा स्वत:च्या तत्त्वांशी (अति)प्रामाणिक असणे म्हणा, गांधीजींकडून असे केले जाऊ शकते, असे मला वाटते.
डोळ्यांदेखत अन्याय्य/चुकीची वागणूक मिळत असतानाही तत्त्वांना चिकटून बसणे हे माझ्यामते आडमुठेपणाचे लक्षण आहे. प्रत्येक माणसाचे स्वत:चे तत्त्वज्ञान,आदर्शवाद असतात. आणि विधायक तसेच वास्तववादी कारणांसाठी तत्त्वांमध्ये लवचिकता येत नसेल, तर असे तत्त्वज्ञान, आदर्शवाद कुचकामी असते, असे माझे वैयक्तिक मत आहे. तेव्हा एकंदरित या बाबतीत गांधीजींना 'क्लीन चिट' देता येणार नाही, असे माझे मत बनले आहे.