भगतसिंगांच्या सुटकेचा त्यांनी ठरावाप्रमाणे (इतका) पाठपुरावा मात्र केला नाही.  हे त्यांच्या तत्त्वाला आणि राजकारणाला धरूनच होते.  पण त्यात जाणून बुजून दुष्टावा केल्यासारखे प्रतिबिंबित होत नाही.  पण माझे मत असे झाले आहे, की त्याजागी भगतसिंग काय त्यांचा स्वत:चा मुलगा असता तरी त्यांनी यापैकी काही केले नसते. 

डोळ्यांदेखत अन्याय्य/चुकीची वागणूक मिळत असतानाही तत्त्वांना चिकटून बसणे हे माझ्यामते आडमुठेपणाचे लक्षण आहे. प्रत्येक माणसाचे स्वत:चे तत्त्वज्ञान,आदर्शवाद असतात. आणि विधायक तसेच वास्तववादी कारणांसाठी तत्त्वांमध्ये लवचिकता येत नसेल, तर असे तत्त्वज्ञान, आदर्शवाद कुचकामी असते, असे माझे वैयक्तिक मत आहे. तेव्हा एकंदरित या बाबतीत गांधीजींना 'क्लीन चिट' देता येणार नाही, असे माझे मत बनले आहे.

त्यांनी भगतसिंगांना सोडून द्या हे अधिक कणखरपणे म्हटले असते तर काय झाले असते हे विचार करण्यासारखे आहे.  त्याने भारताच्या इतिहासात नक्की काय (चांगला/ वाईट) परिणाम झाला असता कोणास माहित? 

इंग्रजांना कणखरपणे 'चले जाव' असे बजावणारे गांधीजी तोच कणखरपणा यावेळी का/कसा दाखवू शकले नाहीत, असा प्रश्न पडला. असो.

एकूण सर्केश्वरांनी व सादर केलेले पुरावे व सर्वसाक्षींचे लेखन, तुम्ही केलेले भाषांतर, चर्चेत भाग घेऊन मते मांडण्याची तसेच इतरांची मते जाणून घेण्याची मिळालेली संधी यांमुळे जे विचारमंथन येथे झाले आहे, त्याबाबत आनंद वाटतो. वैयक्तिक मतमतांतरे असली, तरी यानिमित्ताने एक निकोप चर्चा होत आहे, याचे मोल जास्त वाटते.

धन्यवाद.