फाशी दिली जावी, याचे समर्थन करणारी कारणे -

  1. भारतीय लोकशाहीवर, तिच्या मानबिंदूवर घाला घातला गेला. त्याचे चोख प्रत्युत्तर दिले गेलेच पाहिजे. आणि भविष्यात असा प्रयत्न करण्याचा विचार करणाऱ्यांना त्याचा अंतिम परिणाम काय होणार आहे, याची जाणीव करून देऊन, तशा प्रयत्नांपासून परावृत्त केले गेले पाहिजे.
  2. सुरक्षारक्षकांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता संसदेचे नि पर्यायाने भारतीय लोकशाहीचे रक्षण केले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये.
  3. आवश्यक ती न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन, सर्व पुराव्यांची पडताळणी आणि साक्षीदारांचे सवालजवाब इ. सोपस्कार पूर्ण होऊन मगच ही शिक्षा दिली गेली आहे. म्हणजे न्यायसंस्थेने दिलेली ही शिक्षा अविचारी किंवा घाईघाईने दिलेली नाही.
  4. आपल्या अशा कृत्याची परमावधी कशात होणार, याची कल्पना अफ़जलला नसेल, असे वाटत नाही. त्यावेळी त्याने आपल्या कुटुंबियांचा विचार केला नसेल, तर त्याला शिक्षा व्हायलाच हवी.

फाशी दिली जाऊ नये, याचे समर्थन करणारी कारणे -

  1. फाशीचा दिवस शुक्रवारचा आहे. तसेच रमजानचा पवित्र महिना चालू आहे. अशा वेळी एखाद्या मुस्लिम कैद्यास फाशी देणे, हे मुस्लिम देशबांधवांच्या धार्मिक भावना दुखावणारे ठरेल. असे केल्याने भारत-पाक शांतता प्रक्रियेत किंवा/आणि काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित होण्यास अडथळा येईल.
  2. फाशीची शिक्षा मिळालेल्या गुन्हेगारास सुधारणेची अंतिम संधीही मिळत नाही, किंवा आपल्या दुष्कृत्याचा पश्चात्ताप करण्याचीही नाही.
  3. या फाशीत अनेकांचे अनेक राजकीय हितसंबंध गुंतले असण्याची शक्यता आहे. फाशी टळली, तर अशी छुपी देशद्रोही कृत्ये जर कोणी राजकारणी मंडळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे करीत असतील, तर त्यांचा बचाव होईल.