दस-र्याच्या  शुभ दिवशी जाऊन नवीन चार चाकी आणली, दोन दिवस झाले तापुरता नंबर वरच गाडी रस्त्यावर धावत आहे, पण काल एकदमच गंमत झाली बाहेर जाण्याचे ठरवले मेट्रोपॉलीटीन नावाचा मॉल आहे गुडगाव मध्ये तळ-मजल्यात गाडी ऊभी करण्याची सुविधा देखील आहे पण तेथे तळमजला हा तीन विभागामध्ये आहे पावती घेऊन गाडी पार्क केली व दोन तास ईकडे तीकडे केल्यावर गाडी घेण्यासाठी खाली गेलो तर पावती सापडत नव्हती व गाडी ही.... शेकडो संख्येत गाड्या त्यात माझी गाडी ना नंबर लक्ष्यात ना जागा ! चांगलीच ३०-४० मिनीटे हुडकल्यावर शेवटी घरी फोन करुन गाडीचा तापुरता नंबर मिळवला व पुन्हा २०-३० मिनिटे मी व ते सुरक्षा रक्षक गाडी शोधत एकदम तळ मजल्यावर .... भेटली एकदाची !