नवीनच इंग्रजी शिकत असताना दुकानावरची सेल ची पाटी एकदा साले म्हणून वाचल्याची आठवतेय. बस स्थानकावरच्या प्रत्येक लांबच्या पल्याच्या गाडीवर अमुकतमुक मार्गे ढमूक असं चारदा वाचून झाल्यानंतर मा्झ्या बालमनाला प्रश्न पडला होता की हे 'मार्गे' कोणतं गाव आहे जे प्रत्येक लांब जाणार्या गाडीला पार करावंच लागतं?