आपला प्रतिसाद वाचला आणि अगदी असंच (तुमच्यासारखं)  कुकूऽऽचकू (feel) झालं !

अशाच कोंबड्यांची आता आमाला गरज हाय. ती घराघरातून ... स्वारी ... खुराड्याखुराड्यातून तयार व्हावी यासाठी समद्या कोंबड्यांनी प्रर्यत्न करायची हीच येळ हाये ही गोष्ट बहूजन कोंबड्यांना कळावी. येवढेच नाय तर त्यांनी त्या परीने प्रयत्न करावेत (रोज जमतील तेवढी आंडी घातलीच पायजेन. तेवढ सगळी आंडी लगीच उबवाय्ला पायजेन आन त्यातून नवी पिढी (कोंबडी) तयार केलीच पायजेन. (उगाच २१ दिसाच्या टेम चं सांगाचं नाय बरकां आता संम्द कसं इंस्टांट झालंच पायजान) . बाकीच्या तथाकथीत कोंबड्यांची की ज्यांना केवळ शब्दांचा (कुकूऽऽचकू चा) विपर्यास करणं आन निर्थक चर्चा/कुकूऽऽचकू  एवढेच या विषयाचे महत्त्व वाटतया, त्यांची काळजी करू नये. त्यांच्या माना मुरगाळुच (धडकी भरली का?)... आन दीक्षा घेतली की त्येचाच परसाद करून मस्त कुकुडूऽऽकूऽऽ करू

                                      आपला निर्भिळ समर्थक

                                           कुकूऽऽचकू ऽऽ

लवकरच मी पण या (बाकीच्या तथाकथीत ) गुलाम/कुकुडूऽऽकूऽऽ गीरीतून बाहेर पडणार हाये.

--कुकूऽऽचकू