प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी "समाप्त" हा शब्द असतो हे पाहून "समाप्त" ही काय भानगड असावी याविषयी दोन मित्रांमध्ये वाद झाला. एकजण म्हणाला, "'समाप्त' हा एक अतिशय मोठा विद्वान असला पाहिजे. सर्व पुस्तके त्याने लिहिली असली पाहिजेत. त्यांचा  लेखक म्हणून प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी त्याचे  नाव छापीत असले पाहिजेत." त्यावर दुसरा म्हणाला, "मला वाटतं, 'समाप्त' हे जिथे सर्व पुस्तके छापली जातात त्या छापखान्याचे नाव असले पाहिजे."