रावसाहेब,

मोठा गहन प्रश्न विचारलात. या प्रश्नात अनेक प्रश्न आहेत. -

१) भिंतीवर सहलसखी सोडून तात्या इतरांबरोबर कुलुपे कशाला बांधेल?

२) कुलुप कुणी धरायचे व चावी कुणी लावायची यावर होणारे भांडण कोण मिटवेल? (सर्वच जण चाव्या लावण्यातले हौशी:)))

३) कुलुपावर पहिले नाव कोणाचे यावर जाण्यापूर्वी झालेले एकमत तिथे पोहोचेपर्यंत टिकेल का/ लक्षात राहील का?

४) कुलुपाला बांधायच्या रेशमी फितीचा रंग कोणता असावा यावरुन नवा वाद निर्माण होणार नाही हे कशावरून?

एक सल्ला: इतक्या लांबवर जायचे कष्ट घेण्यापूर्वी आपण व तात्या पर्वतीवर रंगीत तालिम करुन पहा:) ( तालमीच्या वेळी कृपया त्या प्रसंगी भैरवी म्हणावी की 'और चावी खो जाय' म्हणावे यावर वाद घालू नये ही विनंती)