नमस्कार,
शिवाजी राजांचे पराक्रमी सरनौबत, बहलोलखान या शत्रूच्या सेनापतीस जेरीस आणून, स्वतःच्या अखत्यारीत सोडून देतात. तोच बहलोलखान फिरून हल्ला करतो आणि बरेच नुकसान करू लागतो. हे पाहता महाराज रायगडावरून पत्र पाठवतात. त्यामध्ये कडक शब्दांत सरनौबतांस याचा जाब विचारतात. ते पत्र वाचून शामियान्यामध्ये हजर असे सहा वीर आणि सरनौबत क्षणाचाही विचार न करता बहलोलखानाच्या प्रचंड सेनेवर तुटून पडतात. या प्रसंगाचे वर्णन कुसुमाग्रजांच्या 'विशाखा' या काव्यसंग्रहातील 'सात' (या दुव्यावर इतरही अनेक कविता आहेत) या कवितेत आहे. (चू.भू.द्या.ह्या.)
कृपया शुद्धलेखन चिकित्सेचा वापर करावा.
--लिखाळ.