आकृतिबंध शब्द मला ठीक वाटतो आहे. रचना/संरचना कसा वाटतो? मांडणी ह्या शब्दाचाही विचार करावा. संदर्भ कळला तर अर्थाच्या अधिक जवळ जाणारा शब्द शोधता येईल.

सर्किट यांस,
पॅटर्न चा आकृतिबंध असा अर्थ लेखिकेस अभिप्रेत आहे; तोचतोचपणा असा नाही. त्यामुळे इथे वारंवारिता योग्य ठरेल असे वाटत नाही.
वारंवारिता हा शब्द संख्याशास्त्रात frequency साठी वापरतात.  तिथे तोचतोचपणा, पुन्हा पुन्हा येणे हा अर्थ आहे.