नमस्कार!
नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही गेलो आम्ही
येवुनि दुनियेस काही देवुनी गेलो आम्ही
शायरी अर्पुन गेलो, आमचे सर्वस्व ती
दुनिया तुला विसरेल भगवन्, ना आम्हा विसरेल ती!
मानतो देवासही, ना मानतो ऐसे नव्हे,
मानतो इतुकेच की तो आमचा कोणी नव्हे! ;-)
कुसुमे स्वये हासून ज़र का म्हणतील ना आम्हास ये
पाऊल ना टाकू तिथे, बाग ती आमची नव्हे!
...
परमेश्वराने इहलोकीच्या कृत्यांबद्दलचा न्यायनिवाडा करण्यासाठी शायराला बोलावून त्याला इथे ईश्वरसाधना न करता कलेत रमल्याबद्दल, विषयांध बनून राहिल्याबद्दल ज़ाब विचारल्यावर तो निरनिराळ्या प्रकारे ईश्वराला मानवी निर्मितींची, कर्तृत्वाची, सौंदर्याची महती वर्णन करतो आणि म्हणतो:
केली क्षमा आम्ही तुला, आम्हा तेही करावे लागते!
करण्या क्षमा दुसर्यास भगवन, माणूस व्हावे लागते!
आणि काही विनोद:
तिरप्या तिच्या नज़रेवरी बेहद्द झालो खूश मी..
..आज़ पण कळले मला ती ऐसीच बघते नेहमी! ;-)
धाडली प्रणयात आम्ही खूप पत्रे धाडली
लिहिली ऐसी की पूर्वी कोणीच नसतील धाडली
धाडली तिनेही आम्हा काय पण सांगू तिचे -
- सर्व ती माझीच होती एकही नव्हते तिचे!
आपला
(भाऊसाहेबांचा चाहता) मराठा