नमस्कार,

१) आपला प्रश्न उचित आहे. परंतु अशा काही गोष्टी आहेत की ज्या सगळ्यांनाच जमू शकत नाहीत. उदाहरणच द्यायचे तर मी स्वतः 'द्रुपल' या सॉफ्टवेअर च्या मदतीने हा उद्योग करायचा प्रयत्न केला होता. पण ते कोडिंग प्रकार आपल्याच्याने जमला नाही. म्हणून मग ब्लॉग वर समाधान मानावे लागले. त्यामुळे आमच्या सारख्या अज्ञानी लोकांकरता हा रेडीमेड आणि फुकट उपाय आहे.

२) याहू हे सर्च इंजिन असल्याने, तुम्ही नुसते 'मराठी' टाईप केले तरी हजारो
साईट्स, फोरम्स, ब्लॉग्ज तुमच्या पुढे मांडले जातील. ग्रुप जर याहू चाच असेल तर तॊ याहूच्याच डिरेक्टरीत नमूद करायची सोय उपलब्ध असतेच. ती सुविधा मनॊगतावर नाही. मनॊगत हे नाव माहीत असल्याशिवाय किंव्हा 'मराठी' सर्च केल्यावर पहील्या २-४ पानात नाव सापडल्याखेरीज इथे कोणीही येऊ शकेल याची शक्याता कमीच आहे. हा स्वानुभव आहे.

३) आजच्या काळात सर्वात गरजेची असलेली 'फीड' सुविधा तुम्हाला याहू मध्ये आपॊआपच मिळते. जी मनॊगतावर मिळत नाही.

४) तुमच्या ग्रुप ची देखभाल याहू च घेतं. मनॊगत सारखे संकेतस्थळ चालू करायला ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्याची जबाबदारी याहूकडेच असते.

अर्थात याहू वर तुम्हाला जागा कमी मिळते , शिवाय तुम्हाला त्यांनी ठरवून दिलेल्या रंगसंगतीतच तुम्हाला तुमचे संकेतस्थळ बसवावे लागते. अशा काही त्रुटी जरूर आहेत. याहू ग्रुप ठेवावा की नाही यावर हे माझे मत आहे. आता मनोगताशी त्याची सांगड कशी घालावी हे मात्र मला माहीत नाही.