विकिकर साहेबांस,
आपल्याला पडलेला प्रश्न वाचून तर मी अगोदर चक्रावूनच गेलो; कारण एखादा याहू ग्रुप होस्ट करणे आणि एक आख्खी वेबसाइट चालवणे, ती रोजच्या रोज मेंटेन करणे हे कुण्या येऱ्यागबाळ्याचं काम नाही. (मनोगताचे वेलणकरसाहेबच हे सारं करू जाणोत.) त्यामुळे वैयक्तिक पातळीवर विचार केल्यास याहू ग्रुप्सचे प्रयोजन मुळीच संपलेले नाही.
बाकी 'माझी दुनिया' यांच्या तिसऱ्या व चौथ्या मुद्द्याला माझाही पाठिंबा आहे. माननीय प्रशासकांनी RSS Feed च्या सुविधेबद्दल जरूर विचार करावा. ज्यायोगे इंटरनेट जगतात चाललेल्या मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र(संयुक्त?!?), मराठी पुस्तके यासारख्या विषयांवरील माहिती खात्रीशीररीत्या उपलब्ध होऊ शकेल...
- ग्रामिण