कुक्कूट्महोदय,
मी आपल्या कुक्कूट धर्माचा निष्ठावान कार्यकर्ता होऊन प्रचारासाठी फिरू लागलो आहे. (हे शुद्ध भाषेचे जोखड कसे फेकता येईल ते कळत नाहीये.) तर माझ्या स्नेह्याने मला अजून एक कूट प्रश्न विचारला आहे. त्याचे समाधान कराल काय? तर प्रश्न असा,
कुक्कूट धर्मात अंडी आणि कोंबडं खायला परवानगी आहे का? परवानगी असेल तर कुक्कूट धर्मीयांची संख्या कमी होईल. आणि जर परवानगी नसेल तर सात्त्विक वृत्ती अंगी बाणून जाज्वल्य, ज्वलंत विद्रोहाची धार बोथट होईल. आता यातून मार्ग कसा काढणार?
कूकूऽऽऽच कूऽऽऽऽऽ
-- (संभ्रमित) लिखाळ.