दिगम्भा,
इतक्यांदा म्हटलेय रामरक्षा पण आजवर कधी लक्षात नाही आलं हे गुपित. गुपित पुनरुद्धृत केलं असलंत तरी इथे सर्वांना उपलब्ध करून देण्यामागचे तुमचे श्रेय त्यामुळे तसूभरही कमी होत नाही. इतक्या सहजसुंदर शब्दात सहा श्लोकांमधून सूचकपद्धतीने रामचरीत्र कसे सामोरे आणले आहे ते सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. रामरक्षेत दडलेली आणिकही कुठली गुपिते तुम्हाला माहिती असल्यास तीही सांगावी ही विनंती. खरंच.. हा लेख वाचून विस्मयचकित झाले मी एकदम.
विनायक आणि राधिका यांचेही सार्थ कौतुक वाटते रामरक्षा मनोगतवर अवतरवण्यासाठच्या त्यांच्या प्रयत्नांबद्दल.