पंकज,
खूपच सुंदर केलं आहे तुम्ही अनुभवकथन. खूप मजा आली. जाड टाईपातल्या शब्दांनी तर जाम हसू लोटले. घरपरीसराचे तुम्ही केलेले वर्णन अगदी चित्रदर्शी आहे.

बॉम्ब खरा असो की सुतळीबॉम्ब त्याची चाचणी घेतल्यावर विलक्षण हंगामा होतो.

या वाक्याने लेख एका वेगळ्याच उंचीला पोहोचला. खूप छान. तुमचे असेच आणखीनही अनुभव वाचायला खूप आवडेल. पुढील लेखनाला शुभेच्छा.

अवांतर - घाबरटपणा घालवण्यासाठी फटाक्यांचा खरंच खूप उपयोग होतो. एकट्या-दुकट्याने फटाके उडवून बघण्यापेक्षा, सगळे चिडवत असतील तरी त्यांच्या नाकावर टिच्चून त्यांच्याचसमोर पहिल्यांदा घाबरतघाबरत का होईना बाँब फोडण्यातला मजाच काही और ! पहिल्यांदा वाटते भीती पण एकदा फटाके फोडताना स्वतःसहित इतरांना इजा होऊ नये याची कशी काळजी घ्यायची ते कळले की हुरूप येतो. मग एका बाँबचे ते काय विशेष? दिवाळीच्या ऐन थंडीत कुडकुडत बोचऱ्या थंडीला न जुमानता मिट्ट काळोखात बाँबच्या सुद्धा लडी उडवायला भीती वाटत नाही तर धमाल मजा येते !