सुहासिनींनी गांधीजी-आयर्विन/बिर्ला संवाद मराठीतून उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. यात त्यांनी कुठलीही बाजू घ्यायचे टाळले असावे याचे एक कारण कदाचित त्यांना वादात न पडण्याची इच्छा असावी किंवा इतके "नीर-क्षिर" वेगळे करणे शक्य नाही हे समजले असावे!
माझ्या लेखी तात्पर्य: समाजकारणात आणि राजकारणात काम करणारा हा राजसिक असतो आणि म्हणून तो १००% चूक अथवा बरोबर असणे शक्य नाही. म्हणून त्यांचे इतिहास वाचावेत, कालानुरूप आणि परिस्थितीनुरूप चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात आणि कालबाह्य टाकून द्याव्यात.
तस्मात, क्रांतिकारकांचे चाहत्यांनी आत्ताच्या काळात बंदूका घेऊन गोळ्या मारत सुटणे चूक (रंग दे बसंती...) समजावे, आणि गांधींच्या चाहत्याने बकरीचे दूध घेऊन सैन्य नको अथवा शस्त्रबंदी साठी मागे लागणे अथवा सर्वधर्मसमभाव न ठेवता लांगुलचालन करणे टाळावे. नाही तर "एक्स्परीमेंटस विथ ट्रुथ" च्या ऐवजी "ब्लंडर्स इन रिऍलीटी" होईल.