सहज हसत आली पौर्णिमा लोभवाया
कुसुमबहर तेंव्हा लागले मोहराया
क्षितिज गडद होई पूरिया आळवाया
वा. आवडले. "मणिमयखच" सारख्या शब्दांचा खच डोळ्यांना सुखद आणि कानांना लुसलुशीत. मालिनीपायी "निलयन", "कनकरजतरंगी", "करतलपखवाजी" असे शब्द भेटीस येतात.
पण साध्या शब्दांत एखादी साधी भुजंगप्रयातातली कविता झाल्यास आनंद होईल. ज्या कल्पना मुळात सकस-सुदृढ असतात त्यांना थोर शब्दांचे, विशेषणांचे हॉर्लिक्स लागत
नाही. बरेचदा लुसलुशीतपणामुळे पोकळपणा प्रथमदर्शनी दिसत नाही. हे असे असले तरी शिकाऊ असूनही मालिनी वृत्तात कवयित्रीने काव्यलेखन केले ही क्रांती घडली आहे. कविता छान आहे आणि अत्यंत स्तुत्य.
पुढील छंदोमयी रचनेसाठी शुभेच्छा.
चित्तरंजन
अवांतर