मालिनी छान जमली आहे. खूप चांगला प्रयत्न. सुंदर कल्पना व शब्द. सूर्यास्त ते रात्र या कालावधीतील रागांची गुंफण छान केली आहे. भूप आणि यमन यांचा गायनाचा समय साधारण सारखा असावा. मालिनीमुळे काही ठिकाणी अर्थ व शब्दांशी तडजोड करावी लागली आहे असे वाटले. काही कल्पना पुरेशा स्पष्ट वाटल्या नाहीत.
कुसुमबहर तेंव्हा लागले मोहराया
वदन सुमन रंगे लाल रंगात त्याला
त्याला म्हणजे कुणाला?
नयन न मिटणारे जागवी मालकंसी
करतलपखवाजी हे अहा वाजवाया
हा 'अहा' टाळता येईल. त्याऐवजी दुसरा तशा वजनाचा शब्द घ्या.
वि. सू.पाहून एवढे पुरे.. अधिक प्रयत्नांनी एक सुंदर आणि अर्थपूर्ण मालिनी होईल याची खात्री आहे.