क्षमा करा पण तुमच्या नावाचे हे प्रचलित लघुरूप आहे असे कळले. म्हणून वापरते आहे.
तुम्ही विचारले आहे 'त्याला म्हणजे कोणाला'
मला काय म्हणायचं होतं ते स्पष्ट करायचा प्रयत्न करते.
"सहज हसत आली पौर्णिमा लोभवाया
कुसुमबहर तेंव्हा लागले मोहराया
वदन सुमन रंगे लाल रंगात त्याला
मधुरसमय गीते लागले ऐकवाया "
इथे त्याला म्हणजे लाल झालेल्या वदनकुसुमाला
आता हा सगळा प्रयत्नच ओढूनताणून केलेला असल्यामुळे यात फारसा अर्थ लागणार नाही ही भीती पोटात होतीच.
अहा बद्दल धन्यवाद. मी दुसरा शब्द घालून पाहीन.
तुमच्या सूचनांबद्दल मनःपूर्वक आभार.
--अदिती