अदिती कविता अप्रतिम आहे, नेहमीप्रमाणे सुंदर. ही कविता मालिनी मुळे आणखीनच आवडली.
सहज हसत आली पौर्णिमा लोभवाया
कुसुमबहर तेंव्हा येतसे मोहरूनी
वदन हळुच झाले लाल तेव्हा तयांचे
मधुरसमय होता ऐकले गीत त्यांनी

असे काहीसे कर, अर्थ स्पष्ट होईल, शिवाय यमक २, ४ अशा ओळींचे आहे. तुझ्या कडव्यात फेरफार केला; मालिनीत लिहिताना किती तडजोड करावी लागते ते समजले.