[नाव बदलून किस्सा लिहिला आहे, पण खरा घडलेला आहे]

तिंबूनाना एकदा सह कुटुंब चित्रपट पहायला गेले. रात्री उशीराचा खेळ! घरी आल्या आल्या लगेच बाहेरचे कपडे बदलून लेंगा घालायची त्यांची अगदी टापटीप सवय. [पण इतक्या चांगल्या सवयी ही नडतात कधी कधी]

घरी येताच दिवेही न लावता, जाताना उशीर होऊ नये म्हणून बेडवरच सोडलेला लेंगा चढवला. बायकोनी आत येऊन दिवा लावला तो काय, महाशय लेंग्यात नव्हे तर परकरात होते!!!!