सर्वप्रथम सविस्तर उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.

यात वाचल्याप्रमाणे आणि एकदा बाबासाहेब पुरंदरे आणि अविनाश धर्माधिकारी यांची भाषणे ऐकली होती त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा:

ऐन राज्याभिषेक सोहळा तोंडावर आलेला असताना स्वराज्याचा सरनौबत असलेला "ब्लंडर इन रिऍलीटी" करतो हे बघून महाराज चिडले आणि त्यांनी खरमरीत पत्र धाडले. या गाण्याच्या कवितेतील या अर्थाची आधीची कडवी वाचण्याजोगी आहेत. त्यावरून पुढचा इतिहास नीलकांत यांनी चांगला वर्णीला आहे.

मला पण हे गाणे सुरवातीला आवडायचे नाही. असे वाटायचे कुठलीही योजना न करत हल्ला केलेले हे मरण आणि त्याचे कौतूक कशासाठी? पण वरील दोन वक्त्यांच्या भाषणातून समजले की त्या हल्ल्यमुळे बहलोलखानला "मराठा रक्त (प्रांत वाचक)" काय आहे ते परत कळले आणि काय होऊ शकते याचा अंदाज येऊन, तो परत कधी स्वराज्यावर हल्ला करायला आला नाही.

जेंव्हा महाराजांना ही बातमी कळली तेंव्हा ते फक्त (या अर्थी) म्हणाले की, "अरेरे वाईट झाले". त्यांनी त्यांच्या उद्गारातून एव्हढेच दाखवले की सरनौबतांनी जी चूक केली त्याचे प्रायश्चित्त घेतले ते योग्य झाले पण त्यात एक मोहरा गमावला ते वाईट झाले.