मृदुलाशी सहमत. थोडेसे सर्वसाधारण विधान (generilized statement) करायचे झाल्यास, तेच लोक चमकतात जे काहीतरी करून दाखवण्याची धडाडी दाखवतात. या धडाडीच्या आड येणाऱ्या अनेक बाबींपैकी एक म्हणजे मित्रमंडळी आणि आप्तेष्टांचे बोलणे अती मनावर घेणे. स्थानिक प्रांत सोडून परप्रांतात जाणाऱ्यांच्या बाबतीत हा घटक आपोआपच कमी होतो. आणि म्हणून वागण्यात एक प्रकारची उत्श्रुंखलता येते. याला विधायक वळण लागले तर धडाडी बनते.