शायर सूर्यास म्हणतो-
भास्करा येते दया मला तुझी आधीमधी
आहेस का तू पाहिली रात्र प्रणयाची कधी?
सूर्य उत्तर देतो -
आम्हासही ह्या शायराची कीव केऊ लागते
ह्याच्या म्हणे प्रणयास ह्याला रात्र यावी लागते!