आपण मांडलेला मुद्दा हा निश्चितपणे बरोबर आहे. खरोखरच काही चांगले लेखन संग्रहित करण्याची इच्छा कदाचित प्रत्येक सदस्याला होत असेल, परंतु आपण नमूद केलेली योजना ही पूर्णपणे लेखकांवर अवलंबून आहे. कारण जरी हे लेखक मनोगत वर लेखन करीत असतील तरीही त्यांनी त्यांचे साहित्य बाहेरुन पुस्तकरुपाने प्रकाशित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या योजनेत ज्यांना सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी आधी सहभागी व्हावे. तुम्ही स्वत: तुमच्या लेखाचे संकलन करुन चांगली सुरुवात केलेली आहे. माझ्या शुभेच्छा!!!